Mumbai Rain | मुंबईला पावसानं झोडपलं, सकाळपासून पावसाचा जोर कायम
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे राज्यात पुढील काही दिवस पावसाचे असेल. येत्या 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तर येत्या 24 तासांत मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानुसार, मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर कोणकातही मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे राज्यात पुढील काही दिवस पावसाचे असेल. येत्या 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तर येत्या 24 तासांत मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानुसार, मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर कोणकातही मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रात भरतीचा इशारा ४ मीटर उंच लाटा उसळणार. राज्याच्या काही भागात पावसाची जोरदार पावसाची हजेरी होत आहे.
त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
