नवाब मलिकांचा राजीनामा घेतलाच पाहिजे; देवेंद्र फडणवीसांची मागणी
आयटी घोटाळा झाला असेल तर करा ना कारवाई, कुणी थांबवलंय?, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आघाडी सरकारला दिलं आहे. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन आयटीमध्ये (IT scam) 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. याप्रकरणी राऊत यांनी कारवाईची मागणीही केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. आयटी घोटाळा झाला असेल तर करा ना कारवाई, कुणी थांबवलंय?, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आघाडी सरकारला दिलं आहे. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे.
Published on: Mar 02, 2022 01:53 PM
