Aurangabad | दरड कोसळल्यामुळे नागद घाट पूर्णपणे बंद

| Updated on: Sep 07, 2021 | 3:25 PM

कन्नडच्या नागद घाटात पुन्हा कोसळली दरड कोसळली आहे. गौताळा अभयारण्यातील नागद घाटात ही दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे नागद घाट आता  पूर्णपणे बंद झाला आहे. कन्नड चाळीस गाव घाटानंतर आता नागद घाटही बंद झाला आहे.

Follow us on

कन्नडच्या नागद घाटात पुन्हा कोसळली दरड कोसळली आहे. गौताळा अभयारण्यातील नागद घाटात ही दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे नागद घाट आता  पूर्णपणे बंद झाला आहे. कन्नड चाळीस गाव घाटानंतर आता नागद घाटही बंद झाला आहे. जळगाव चाळीसगाव धुळे वरून येणाऱ्या वाहनांसाठी रस्ता बंद झाला. कन्नड चाळीसगाव घाट बंद झाल्यामुळे नागद घाटाचा  वापर सुरू होता. आता नागद घाटही बंद झाल्यामुळे रहदारीचे दोन्ही महत्वाचे रस्ते बंद झाले आहेत.

औरंगाबादमधील चाळीसगाव, कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी झालीय. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला, तर कन्नड चाळीसगाव घाटात दरड कोसळली. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार माजलाय. ढगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय.