Nagpur : अरररर भाई ये क्या है… घराच्या गॅलरीतूनच गेला उड्डाणपूल, नागपुरात अजब प्रकार, बघा व्हिडीओ
नागपुरातील अशोक चौकात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा एक भाग प्रवीण पत्रे यांच्या घराच्या बाल्कनीतून जातोय. एनएचआयने नागपूर महानगरपालिकेला हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी केली आहे.
नागपुर शहरातील अशोक चौकात बांधल्या जात असलेल्या नवीन उड्डाणपुलामुळे एक अजब प्रकार घडला आहे. उड्डाणपुलाचा एक भाग प्रवीण पत्रे यांच्या घराच्या बाल्कनीतून गेल्याचे पाहायला मिळत आहे. या अजब प्रकारानंतर चर्चा सुरू होताच एनएचआयने हे बांधकाम नियमानुसार असल्याचे सांगितले आहे, तर नागपूर महानगरपालिका या घराचे बांधकाम अनधिकृत असल्याचे म्हणते. महानगरपालिकेने एनएचआयकडून पत्र प्राप्त झाल्यावर हे घर पाडण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ज्यांच्या घरातून हा उड्डाणपुल गेला त्या घराचे घरमालक प्रवीण पत्रे यांना यामुळे अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तरीसुद्धा, भविष्यातील अपघाताच्या शक्यतेमुळे महानगरपालिका पुढील कारवाई करू शकते. सोशल मीडियावर हा अजब प्रकाराचा व्हिडीओ आणि फोटो चांगलाच व्हायरल होत आहे त्यामुळ हा प्रकार सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Published on: Sep 20, 2025 05:42 PM
