Nagpur | नागपुरात 24 तासांत 2 कोचिंग क्लासेसवर धडक कारवाई

Nagpur | नागपुरात 24 तासांत 2 कोचिंग क्लासेसवर धडक कारवाई

| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 9:44 AM

नागपुरात विनापरवानी कोचिंग क्लासेस सुरु असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मनपाच्या उपद्रव शोध पथकाने मोठी कारवाई करत गेल्या 24 तासांत दोन कोचिंग क्लासेसवर धडक कारवाई केली आहे. नागपुरातील गांधीबाग झोन अंतर्गत 2 कोचिंग कलासेसवर कारवाई करण्यात आली आहे.

नागपुरात विनापरवानी कोचिंग क्लासेस सुरु असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मनपाच्या उपद्रव शोध पथकाने मोठी कारवाई करत गेल्या 24 तासांत दोन कोचिंग क्लासेसवर धडक कारवाई केली आहे. नागपुरातील गांधीबाग झोन अंतर्गत 2 कोचिंग कलासेसवर कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या क्लासेसकडून 10,000 चा दंड वसूल करण्यात आला आहे. मनपाने काल 42 प्रतिष्ठाने आणि मंगल कार्यालयांची तपासणी केली.