नागपूर – पुणे शहरांना जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू

नागपूर – पुणे शहरांना जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू

| Updated on: Aug 10, 2025 | 1:46 PM

विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मी स्वतः रेल्वे मंत्र्यांना विनंती केली होती. नागपूर ते पुणे प्रचंड ट्रॅफिक आहे. त्यामुळे एक  वंदेभारत एक्सप्रेस सुरु केली पाहिजे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि आज नागपूर- पुणे वंदे भारत ट्रेन सुरु होत आहे. हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा मार्ग आहे. अतिशय वेगाने आणि चांगल्या सोईयुक्त नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना यामधून प्रवास करता येणार आहे. केवळ १२ तासात हा प्रवास होईल. या वंदेभारत ट्रेनसाठी पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्र्यांचे आभार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. आज विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे ते नागपूर हे अंतर आता अवघ्या 9 तासांत पूर्ण होणार आहे. उद्घाटनावेळी बोलताना फडणवीस यांनी नगर ते पुणे रेल्वे मार्गही लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर केले.

Published on: Aug 10, 2025 01:46 PM