Nagpur News : मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या; नागपुरात विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

Nagpur News : मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या; नागपुरात विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

| Updated on: Jul 10, 2025 | 10:18 AM

नागपूर जिल्ह्यात एक शाळा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही शाळा एका मोठ्या हॉलमध्ये केवळ पडद्यांच्या आधारे वर्गांची विभागणी करून चालवली जात आहे.

गजानन उमाटे, प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यात एक शाळा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही शाळा एका मोठ्या हॉलमध्ये भरत असून पहिले ते 10 पर्यंतच्या वर्गांची विभागणी ही पडदे लाऊन करण्यात आली आहे. एकाच हॉलमध्ये केवळ पडद्यांच्या आधाराने वर्ग खोल्या बनवून ही शाळा चालवली जात आहे.

नागपूरच्या पुनर्वसित शिवणगांव येथे ही शाळा भरते. याठिकाणी पूर्वीची शाळा होती जी लाखो रुपये खर्च करून बनवण्यात आली होती. मात्र गावाचं पुनर्वसन झालं आणि नवीन ठिकाणी आलं. इथे या मुलांच्या शाळेची कोणतीही वेगळी व्यवस्था अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळेने समाजभवनात मुलांच्या शाळेची तात्पुरती व्यवस्था केली आहे. याच ठिकाणी समाजभवनाच्या मोठ्या हॉलमध्ये केवळ पडद्यांच्या आधाराने पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग पाडण्यात आलेले आहेत. मात्र या व्यवस्थेमुळे प्रत्येक वर्गाचा आवाज हा एकमेकांना ऐकू येतो. त्यामुळे शिक्षण घेण्यात आणि शिकवण्यात अडचणी येतात. यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याने लवकरात लवकर मुलांच्या शाळेची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

Published on: Jul 10, 2025 10:18 AM