Nana Patole | सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना मदत द्यावी, काँग्रेसची मागणी

Nana Patole | सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना मदत द्यावी, काँग्रेसची मागणी

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 11:26 PM

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी तसेच मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी तसेच नाले दुथडी भरुन वाहत असून शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यात फक्त 48 तासांत तब्बल दहा नागरिकांचा मृत्यू झालाय. तर तब्बल 200 जनावरे वाहून गेली आहेत. ही सर्व परिस्थिती गंभीर आहे.

मुंबई :  मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी तसेच मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी तसेच नाले दुथडी भरुन वाहत असून शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यात फक्त 48 तासांत तब्बल दहा नागरिकांचा मृत्यू झालाय. तर तब्बल 200 जनावरे वाहून गेली आहेत. ही सर्व परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी तसेच नुकसानग्रस्तांची मदत करावी असेसुद्धा नाना पटोले म्हणाले आहेत.