Chandrapur : पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित्त थरारक झुंजी, नंदी समाजाच्या प्रथेची सर्वत्र चर्चा

| Updated on: Oct 23, 2025 | 11:45 AM

चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी, हजारो बघ्यांची झाली गर्दी, अवघ्या काही तासात वर्षभराच्या तयारीचा लागला कस, बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ आहे भलताच लोकप्रिय

चंद्रपूर शहरातील नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने रेड्यांच्या झुंजीचे आयोजन केले जाते. बलीप्रतिपदा म्हणून गायी-बैलांना सजवून त्यांना गोड-धोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचा खेळ खेळला जातो. शर्यतींवर पैजाही लागतात. अवघ्या काही तासात रेड्याचे मालक पुंजी कमावून होऊन परतही जातात. यंदाही शहरातील नेहरू नगर लगत असलेल्या आधीच ठरलेल्या जागी मैदानावर सकाळपासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली.

रेड्यांचे मालकही आपापले रेडे उत्तम सजवून मैदानात घेऊन आले. आणि मग सुरु झाला झुंजीचा खरा थरार. शेकडोंच्या संख्येत लोक या मैदानात जमून या चित्तथरारक झुंजीचे साक्षीदार झाले तर अनेक शौकीनांनी थेट शर्यतीच्या मैदानात आपले नशीब आजमाविले. रेडे आले . झुंजले. हरले-जिंकले. जल्लोष झाला. फायदा-तोट्याचे गणित याच मैदानात सोडून पुढल्या वर्षीचा वादा करत रवाना झाले. या शर्यतीच्या थरारात सहभागी होणारे मात्र हा प्रकार अनेक पिढ्यांपासून सुरु असल्याचे सांगतात. बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ. या खेळात हे रेडे कधीही उलटून गर्दीवर तुटून पडू शकतात . मात्र जीवाची भीती असूनही हा खेळ दरवर्षी खेळला जातो.

Published on: Oct 23, 2025 11:45 AM