केसेस कशा रद्द करायच्या हे अजितदादांकडून शिकावं, नारायण राणे यांचा टोला

केसेस कशा रद्द करायच्या हे अजितदादांकडून शिकावं, नारायण राणे यांचा टोला

| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 1:28 PM

मी अजून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलेलो नाही. एका रात्रीत आपल्यावरील केसेस आणि आरोप कशा काढायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकावं, असं नारायण राणे म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता केली. अजित पवारला अजून अज्ञान आहे. त्यांनी त्यांच्या खात्याचं पाहाव. मी अजून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलेलो नाही. एका रात्रीत आपल्यावरील केसेस आणि आरोप कशा काढायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकावं, असं नारायण राणे म्हणाले. माझ्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम खातं माझ्याकडं आहे. उद्योजक बनवणारा आणि रोजगार निर्माण करणारा विभाग आहे. दरडोई उत्पन्न वाढवणारा विभाग आहे. निर्यात वाढवणारा हा विभाग आहे. देशाचा जीडीपी वाढवणारा हा विभाग आहे. सिंधुदुर्गवासियांना  सांगेन की उद्योजक व्हा, आमच्या विभागातर्फे तुम्हाला मदत केली जाईल. अर्जांची छाननी करुन मार्गदर्शन करावं, अशा सूचना अधिकाऱ्यांना देतो, असं नारायण राणे म्हणाले.

Published on: Aug 29, 2021 01:10 PM