Aryan Khan Arrest | ड्रग्ज पार्टीप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक, थेट LIVE UPDATE

Aryan Khan Arrest | ड्रग्ज पार्टीप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक, थेट LIVE UPDATE

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 5:21 PM

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर अटक झाली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. एनसीबी अधिकारी आर्यनला मुंबईच्या जे जे रुग्णालयात मेडिकल तपासणीसाठी घेऊन गेले आहेत.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर अटक झाली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. एनसीबी अधिकारी आर्यनला आता मुंबईच्या जे जे रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन गेले आहेत. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वैद्यकीय चाचणीनंतर आर्यनला मुंबईत कोर्टात हजर केलं जाणार आहे. एनसीबीने आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना अटक केली आहे. त्याबाबतची अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एनसीबीने आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी चौघांची चौकशी झाली असून त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. इतर चार जणांची एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे.