Nashik :  तृतीयपंथी, वेश्यांचा राडा; पोलिसांसमोरच काढला कोयता अन्…. धार्मिक ओळख असलेल्या नाशिकच्या इभ्रतीला नख

Nashik : तृतीयपंथी, वेश्यांचा राडा; पोलिसांसमोरच काढला कोयता अन्…. धार्मिक ओळख असलेल्या नाशिकच्या इभ्रतीला नख

| Updated on: Jul 26, 2025 | 5:31 PM

गेल्या अनेक महिन्यांपासून राजरोस हा सगळा नंगानाच सुरू असताना पोलिसांकडून मात्र दुर्लक्ष केलं जातंय.

चंदन पुजाधिकारी, नाशिक

नाशिकच्या मध्यवर्ती भागात तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी राडा घातल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरात एका तृतीयपंथीकडून हातात कोयता घेऊन एका इसमावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या समोर या तृतीयपंथीच्या हातात कोयता असल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमध्ये तृतीयपंथी आणि वैश्यांचा सर्वत्र सुळसुळाट पाहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

नाशिकमधील सिटी सेंटर मॉल परिसर, त्रंबक नाका परिसर, गडकरी चौक, सीबीएस सिग्नल या भागात दररोज रात्री 9 ते मध्यरात्रीपर्यंत तृतीयपंथी आणि वैश्यांचा वावर असतो. नाशिक पोलिसांकडून मात्र या सगळ्या प्रकाराबाबत तक्रारी येऊनही कानाडोळा करण्यात येत आहे. या सगळ्याप्रकारामुळे तीर्थक्षेत्र, अध्यात्मिक शहर अशी ओळख असलेल्या नाशिकच्या शांततेला आणि इभ्रतीला नख लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय. अशातच हातात कोयता घेऊन तृतीयपंथ्याने भर रस्त्यात राडा घातल्यानंतर नागरिकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

Published on: Jul 26, 2025 05:28 PM