Nashik Flood : गोदावरीचं पाणी वाढलं, दुतोंड्या मारूती बुडाला, रस्त्यांना नदीचं रूप, बघा भीषण पूरस्थिती
नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला असून, पुराचा मापदंड मानला जाणारा दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. गंगापूर धरणातून ९ हजार ८४८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रामकुंड परिसर जलमय झाला आहे.
नाशिकच्या गोदावरी नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून, नदीने रौद्र रूप धारण केले आहे. पुराचा मापदंड मानला जाणारा दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून ९ हजार ८४८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात आहे. यामुळे गोदावरीचे पाणी आता शहरात घुसण्यास सुरुवात झाली आहे. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. रस्त्यांवरही पाणी साचल्याने त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्याची परिस्थिती पाहता, पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published on: Sep 28, 2025 06:20 PM
