Nashik Rain : लासलगावात मुसळधार पावसाचं थैमान, विहीर अर्धी पाण्यात तर पिकांचं मोठं नुकसान अन्… बळीराजा चिंतेत

Nashik Rain : लासलगावात मुसळधार पावसाचं थैमान, विहीर अर्धी पाण्यात तर पिकांचं मोठं नुकसान अन्… बळीराजा चिंतेत

| Updated on: Oct 26, 2025 | 3:22 PM

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, निफाड, येवला, चांदवड तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीत पाणी साचले असून, विहिरींमध्ये गाळ जमा झाला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवाळीपूर्वी जाहीर केलेले सरकारी अनुदान अद्यापही मिळाले नसल्याने शेतकरी मदतीची प्रतीक्षा करत आहेत, यामुळे शेती करावी की नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

नाशिकच्या लासलगावात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे परिसरातील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, विहिरींमध्येही मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड, येवला आणि चांदवड या तालुक्यांमध्येही रात्री जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतीने अक्षरशः तळ्यात रूपांतर केले आहे.

पिंपळगाव नजीक येथील एका शेतकऱ्याच्या शेतात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. विहिरी पूर्णपणे भरल्या असून, त्यात गाळ जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने पंचनामे केले आणि दिवाळीपूर्वी आर्थिक मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिवाळी होऊन पाच-सहा दिवस उलटूनही अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, किंवा कोणतीही मदत मिळालेली नाही. यामुळे शेती करावी की नाही, असा प्रश्न अनेक तरुण शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Published on: Oct 26, 2025 03:22 PM