नाशिक ‘ नो हेल्मेट ‘नो पेट्रोल” मोहीम सुरु,छगन भुजबळांचं नाशिककरांना हेल्मेट वापरण्याचं आवाहन

| Updated on: Aug 15, 2021 | 2:01 PM

नाशिक शहरात आजपासून हेल्मेट सक्ती करण्यात आलीये. ' नो हेल्मेट 'नो पेट्रोल" ही मोहीम राबवली जाणार आहे. हेल्मेट सक्तीसंदर्भातील सक्त सूचना पोलीस आयुक्तांनी शहरातील पेट्रोल पंप चालकांना दिल्या आहेत.

Follow us on

नाशिक शहरात आजपासून हेल्मेट सक्ती करण्यात आलीये. ‘ नो हेल्मेट ‘नो पेट्रोल” ही मोहीम राबवली जाणार आहे. हेल्मेट सक्तीसंदर्भातील सक्त सूचना पोलीस आयुक्तांनी शहरातील पेट्रोल पंप चालकांना दिल्या आहेत. ज्या पेट्रोल पंपावर सूचनांचं पालन होणार नाही, अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्यकाला ही हेल्मेट सक्ती असल्याने पोलीस आयुक्त कार्यलयाकडून शहरातील पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना देखील हेल्मेटचे वाटप करण्यात आले आहे.अपघातात हेल्मेट नसल्यामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा लक्षात घेता ही मोहीम पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी घेतली आहे. दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सरोज अहिरे यांना हेल्मेट परिधान केल्यानंतर पेट्रोल देण्यात आलं. तर हेल्मेट घातलेल्या पोलिसांना देखील प्रातिनिधीक स्वरुपात भुजबळ यांच्याकडून पेट्रोल देण्यात आलं. अपघातामध्ये हेल्मेट घातलेलं असल्यास जीव वाचू शकतो, असंही छगन भुजबळ म्हणाले.