Nashik Honey Trap Case : कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार तपासणार; हनीट्रॅप प्रकरणी अधिकाऱ्यांची अंतर्गत चौकशी?
राज्यात खळबळ उडवणाऱ्या नाशिक हनीट्रॅप प्रकरणी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात झाली आहे.
नाशिक हनीट्रॅप प्रकरणी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात झाली आहे. अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स देखील तपासले जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची देखील शक्यता असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
तर संबंधित अधिकाऱ्यांनी ‘त्या’ हॉटेल व्यवसायिकाच्या संस्थांना मदत केली का, याची चौकशी देखील सुरू असल्याचं समजलं आहे. हॉटेल व्यवसायिकाच्या जमिनी व्यवहारांबाबत सखोल तपास होणार आहे. महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स आणि संबंध तपासणीच्या चौकटीत आहे असं सूत्रांनी सांगितलं आहे. गुन्हे शाखा आणि गुप्तचर विभाग यांची संयुक्त माहिती संकलन मोहीम सुरू झाली आहे. तसंच तपासादरम्यान संशयास्पद आर्थिक देवघेव उघड होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासनाचं लक्ष गुंतवणूकदारांवर आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आहे. दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची शक्यता आहे. त्यामुळे हनी ट्रॅप प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी चौकशी वेगाने सुरू असल्याचं दिसून येत आहे.
