चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

| Updated on: Feb 16, 2025 | 4:45 PM

मुलाने चक्क आपल्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी चॉपरचा वापर केला. मात्र चॉपरने केक कापणे या बर्थडे बॉयला चांगलंच महागात पडले आहे. या मुलाचा चॉपरने केक कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला.

नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे पाहायला मिळालंय. आपली हौस मौज म्हणून आणि रॉयल स्टाईलने एका बर्थडे बॉय आपल्या वाढदिवसाचा केक कापल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या मुलाने चक्क आपल्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी चॉपरचा वापर केला. मात्र चॉपरने केक कापणे या बर्थडे बॉयला चांगलंच महागात पडले आहे. या मुलाचा चॉपरने केक कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी बर्थडे बॉयचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई केली. क्राइम ब्रांच युनिट एकच्या पथकाला चॉपरने केक कापणार असल्याची बातमी मिळाली होती. तसंच हा मुलगा कंबरेला चॉपर लावून दहशत निर्माण करीत असल्याचीह माहिती पोलिसांना देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून गजानन गणेश शेळके या वीस वर्षीय बर्थडे बॉयला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी केवळ गुन्हाच नाहीतर त्याच्या ताब्यातून स्टीलचा धारदार चॉपर देखील जप्त केला आहे.

Published on: Feb 16, 2025 04:45 PM