Nashik : त्या तिघी-चौघी आल्या अन् टेम्पो चालकावर दादागिरी, महिला बाऊन्सर्सची गुंडगिरी, नाशिकचा व्हिडीओ व्हायरल
नाशिकमध्ये तीन ते चार महिलांनी एका टेंम्पो चालकावर गुंडगिरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलांनी चालकाला शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
नाशिक शहरात एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तीन ते चार बाऊन्सर्स महिला एका टेम्पो चालकावर अरेरावी, दादागिरी करताना दिसत आहेत. यावेळी महिलांनी चालकाला शिवीगाळ केली आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना भर रस्त्यात घडली असून, या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड झाल्याने ही घटना समोर आली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, गुंडगिरी करणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी या घटनेबाबत चौकशी सुरू केली आहे. या घटनेने नाशिक शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
Published on: Sep 23, 2025 11:42 AM
