Nashik : नाशिककरांना खुशखबर! वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न मिटला

Nashik : नाशिककरांना खुशखबर! वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न मिटला

| Updated on: Jun 26, 2025 | 9:28 AM

Nashik Rain Updates : नाशिकमध्ये एकीकडे गोदावरीत पाण्याची पातळी घटली आहे. तर दुसरीकडे गंगापूर धरणात पाण्याचा पुरेसा साठा झालेला आहे.

नाशिकमध्ये काल रात्रीपासूनच पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झालेली असून हवामान खात्याने आज नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीतील पाणीपातळी कमी झाली आहे. दुतोंड्या मारोतीच्या पायाजवळ आता पाणी आलं आहे.

नाशिक जिल्हा आणि शहर परिसरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. गंगापूर धरणात सध्या 60 टक्के एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे नाशिकच्या गोदावरीच्या पाणीपातळीत झालेली वाढ देखील कमी झाली आहे. पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून दुतोंड्या मारोतीच्या कंबरेला लागलेलं पाणी आता पायाजवळ आलेलं आहे. दरम्यान, नाशिककरांना मुबलक असा पाणीसाठा आता गंगापूर धरणात आहे. त्यामुळे किमान पुढच्या वर्षभराचा नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न आता मिटलेला आहे असंच चित्र सध्या बघायला मिळत आहे.

Published on: Jun 26, 2025 09:27 AM