Shahajibapu Patil यांनी बोलताना सामाजिक भान राखणे गरजेचे

Shahajibapu Patil यांनी बोलताना सामाजिक भान राखणे गरजेचे

| Updated on: Sep 15, 2022 | 12:37 AM

तुमचा एक डायलॉग फेमस झाला पण चुकीची विधान करून समाजातील तरुणांना बिघडवू नका, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दिली.

पुणे : आमदार असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अशी भाषा वापरणे मुळात चुकीचं आहे. एकीकडे म्हणतात की, एवढ्या वर्षात मी बायकोला साडी नाही घेऊ शकलो, जर ही गोष्ट वहिनीला कळली असेल तर वहिनींनी नक्कीच तुमचा कान धरला असता. लोकप्रतिनिधी म्हणून आपण समाजासमोर काय वक्तव्य करतोय याचं भान ठेवा. लोकांनाही असं वाटतं की जर बापूंनी मिळवा उधळला तर आपणही उधळायला हवा. समाजात लोकांना असाच मेसेज जातो. तुम्ही कीर्तन जरूर करा पण त्यात आपल्या भागाचा विकास कसा करणार यावरही बोला. तुमचा एक डायलॉग फेमस झाला पण चुकीची विधान करून समाजातील तरुणांना बिघडवू नका, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दिली.

Published on: Sep 15, 2022 12:37 AM