Home Ministery Affairs : युद्धाची चाहूल? सर्व राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश

Home Ministery Affairs : युद्धाची चाहूल? सर्व राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश

| Updated on: May 05, 2025 | 7:12 PM

येत्या 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून देशातल्या सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत.

गृहमंत्रालयातून सगळ्या राज्यांना आदेश गेलेले आहेत. येत्या 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेले आहेत. देशातल्या सगळ्या राज्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी सायरन वाजवण्याचे देखील सर्व राज्यांना निर्देश दिलेले आहेत. या मॉक ड्रिल अंतर्गत राज्यांतर्गत आपत्कालीन व्यवस्थानचे सायरन वाजवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिलेले हे आदेश आहेत. प्रत्येक राज्यातल्या सुरक्षा यंत्रणा तपासा, त्या सुसज्ज ठेवा यासाठी हे मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही पावलं कुठेतरी युद्धाच्या दिशेने जात आहेत का? अशीदेखील चर्चा आता सुरू झाली आहे.

Published on: May 05, 2025 07:12 PM