Breaking | नवी मुंबईत नामांतराचा वाद चिघळणार, भूमिपुत्र सिडकोला घेराव घालणार

| Updated on: Jun 24, 2021 | 8:34 AM

आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबई आणि पनवेल मध्ये 5 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत.

Follow us on

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज (24 जून) सिडको घेराव आंदोलन करणार आहे. यावेळी तब्बल एक लाखांहून अधिक जण यात सहभागी होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच आत कुणीही प्रवेश करू नये म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबई आणि पनवेल मध्ये 5 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत.