Navid Mushrif : गोकुळच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफांच्या पुत्राची वर्णी; नविद मुश्रीफ नवे अध्यक्ष
Gokul Milk Election : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आलेली आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजता पार पडलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी समर्थकांनी एकच जल्लोष केला.
गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्षपदावरून बरीच चर्चा रंगली होती. अनेक राजकीय चर्चाना सुद्धा वेग आला होता. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम लागलेला आहे. गोकुळच्या अध्यक्षपदी कोण बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागेललं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये थेट हस्तक्षेप केल्याने आता महायुतीचा अध्यक्ष झाला आहे. गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांची या पदावर निवड करण्यात आलेली आहे. नविद हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत.
Published on: May 30, 2025 05:13 PM
