बच्चू कडूंनी आमच्याकडे मैदानाची मागणी केली असती तर… नवनीत राणा काय म्हणाल्या?

| Updated on: Apr 24, 2024 | 12:20 PM

दिल्लीचे मोठे नेते असो, महाराष्ट्राचे मोठे नेते असो ते अमरावतीत येताय, त्यांनी माझी अमरावती कशी आहे, असे म्हणत राहुल गांधी यांची सभा अमरावतीत होतेय मला अभिमान वाटतोय, असं नवनीत राणा म्हणाल्या. अमरावतीमध्ये आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होतेय, यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली

पाचवर्ष ज्या पद्धतीने काम केलं, गोर गरिब जनतेची सेवा केली, त्यामुळे देशातील नेत्यांना नवनीन राणाला पराभूत करण्यासाठी अमरावतीत यावं लागतंय त्यामुळे याचा अभिमान वाटतो. दिल्लीचे मोठे नेते असो, महाराष्ट्राचे मोठे नेते असो ते अमरावतीत येताय, त्यांनी माझी अमरावती कशी आहे, असे म्हणत राहुल गांधी यांची सभा अमरावतीत होतेय मला अभिमान वाटतोय, असं नवनीत राणा म्हणाल्या. अमरावतीमध्ये आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होतेय, यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली तर काल अमरावतीमधील सायन्स कोर मैदानावरुन बच्चू कडू आक्रमक झाले होते. यावेळी त्यांच्यात आणि पोलिसांत वादही झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावर नवनीत राणांना सवाल केला असता त्या म्हणाल्या, ‘देशाचे गृहमंत्री अमित शाह येतायत. मैदानासाठी पहिला विनंती अर्ज केला होता. राजकीय मतदान होईपर्यंत असे वाद होत असतात. आपल्या पक्षाचा मोठा नेता त्या क्षेत्रात येतोय, त्यांच्या पक्षाचा मोठा नेता असता, मैदानाची मागणी केली असती, तर मैदान दिलं असतं. तेवढी परिपक्वता दाखवली पाहिजे’, असे त्यांनी म्हटलं.

Published on: Apr 24, 2024 12:20 PM