Navneet Rana : ‘ठाकरे बंधू फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आलेत’, नवनीत राणांचा घणाघात
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चावर गंभीर आरोप केला आहे. हा मोर्चा विचारांसाठी नसून, फक्त दुकानदारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेवरील नियंत्रणासाठी असल्याचे त्यांनी म्हटले. राणा यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी त्यांनी प्रतारणा केल्याचे नमूद केले.
मुंबईत ईव्हीएमविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चावर भाजपनेत्या नवनीत राणा यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. हा मोर्चा विचारांवर आधारित नसून, केवळ ‘दुकानदारी’ चालवण्यासाठी, विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेवरील (BMC) नियंत्रण मिळवण्यासाठी काढण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
राणा यांनी राज ठाकरे लोकलमधून प्रवास करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले, परंतु त्याच वेळी ठाकरे कुटुंबाला आज रस्त्यावर येऊन फक्त मतांसाठी हात जोडावे लागणे दुर्दैवी असल्याचे म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी त्यांच्याच मुलांनी प्रतारणा केल्याचे नमूद करत, बाळासाहेबांनी पेरलेल्या विचारांचे काय झाले, हे पाहून ते नक्कीच दुःखी होत असतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Published on: Nov 01, 2025 02:25 PM
