Navratri 2021 | तुळजाभवानी देवीच्या देवळात मानाच्या काठ्या दाखल

| Updated on: Oct 14, 2021 | 12:27 PM

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीच्या (Chaitra Navratri 2021) नऊ रुपांची पूजा केली जाते. या दरम्यान भक्त विधीवत देवी दुर्गाची पूजा करतात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे.

Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीच्या (Chaitra Navratri 2021) नऊ रुपांची पूजा केली जाते. या दरम्यान भक्त विधीवत देवी दुर्गाची पूजा करतात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. तुळजाभवानी देवीच्या मानाच्या काठ्या या आता तुळजापूर येथे दाखल होत आहे, सोलापूर येथून या मानाच्या काठ्या या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन मंदिर प्रदक्षिणा करून परत जातात. यावेळी भाविक 25 ते 30 फूट उंच असलेली काठी खांद्यावर घेऊन 100 किमी अंतरावरून चालत येतात, वाद्यांच्या आवाजात आई राजा उदो उदोची घोषणा केली जाते.