Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 3 October 2021

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 3 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 5:39 PM

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर अटक झाली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने धाड टाकली होती. त्यावेळी आर्यनसह आणखी काहीजण त्याठिकाणी सापडले असून अखेर एनसीबीने त्यांना अटक केली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर अटक झाली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. एनसीबी अधिकारी आर्यनला आता मुंबईच्या जे जे रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन गेले आहेत. आर्यनने ड्रग्ज सेवन करण्यासाठी सोबत नेल्याची कबुली एनसीबी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे ड्रग्ज सेवन आणि बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आले आहे. मेडिकल टेस्ट झाल्यानंतर आर्यनसह चारही आरोपींना जिल्हा कोर्टात हजर केलं जाईल. आर्यनच्या मेडिकल चाचणीसाठी एनसीबी अधिकाऱ्यांची एक व्हॅन निघाली आहे. त्यांच्यासोबत मुंबई पोलिसांची देखील एक व्हॅन सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आली आहे.

वैद्यकीय चाचणीनंतर आरोपींना जिल्हा कोर्टात हजर केलं जाईल. तिथे त्यांच्या कस्टडीची मागणी केली जाईल. एनसीबी अधिकाऱ्यांकडून किती दिवसांची मागणी केली जाते हे महत्त्वाचं आहे. कोर्टात आता नक्की काय घडेल ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण गेल्या दोन वर्षातील ही मोठी हाय प्रोफाईल केस आहे.