इकबाल कासकरच्या अडचणी वाढल्या, ड्रग्स प्रकरण एनसीबी करणार चौकशी

इकबाल कासकरच्या अडचणी वाढल्या, ड्रग्स प्रकरण एनसीबी करणार चौकशी

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 4:49 PM

इकबाल कासकर याचं अटक वॉरंट कोर्टा कडून मिळवून आता इकबाल कासकर याचा एनसीबीचे अधिकारी ताबा घेणार आहेत.

इकबाल कासकरची एनसीबीकडून ड्रग्स प्रकरण एनसीबी चौकशी करणार आहे. काश्मीर येथून मोठ्या प्रमाणात हशीश मुंबई आणून त्याची विक्री होत होती. या रॅकेट वर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईतून या प्रकरणात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याच संबंध असल्याचं उघड झाल्यानंतर आता इकबाल कासकर याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इकबाल कासकर याच अटक वॉरंट कोर्टा कडून मिळवून आता इकबाल कासकर याचा एनसीबीचे अधिकारी ताबा घेणार आहेत. इकबाल कासकर हा सध्या जेल मध्ये आहे. त्याचा जेल मधून ताबा घेतला जाणार आहे.