NCP :  हाके देशी दारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर… ढेकूण असा उल्लेख करत कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?

NCP : हाके देशी दारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर… ढेकूण असा उल्लेख करत कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?

| Updated on: May 30, 2025 | 2:31 PM

राजकीय पोळी भाजण्यासाठी ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. यापुढे जर अजित पवारांवर टीका केली तर महाराष्ट्रात फिरणं मुश्कील होईल, असा इशारा लक्ष्मण हाकेंना दिलाय.

लक्ष्मण हाके हे देशी दारूचे ब्रँड अँम्बेसिडर आहे, अशी जिव्हारी लागणारी टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी केली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर हा पलटवार करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर सूरज चव्हाण यांच्याकडून लक्ष्मण हाके यांचा ढेकूण असाही उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार यांच्यावर टीका करण्याची लक्ष्मण हाके यांची लायकी नाही, असं म्हणत सूरज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे. अजित पवार हे गोचिडसारखे अर्थ खात्याला चिटकून बसले आहेत. त्यांचं राजकारण सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता असं आहे. ते सामाजिकदृष्ट्या असंवेदनशील असल्याचे टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती.

Published on: May 30, 2025 02:31 PM