Ajit Pawar NCP : दादांचा आणखी एक मंत्री वादात, नातलगांवरही गंभीर आरोप, ‘वडिलांनी विष घेतलं आता…’

Ajit Pawar NCP : दादांचा आणखी एक मंत्री वादात, नातलगांवरही गंभीर आरोप, ‘वडिलांनी विष घेतलं आता…’

| Updated on: Oct 27, 2025 | 11:34 AM

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या नातेवाईकावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यांच्या भाचे जावयाने एका शिक्षकाच्या नावे कर्ज घेऊन ते न फेडल्याने शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप शिक्षकाच्या मुलीने केला असून, रोहित पवार यांनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणावर अद्याप मंत्र्यांची बाजू आलेली नाही.

लातूरच्या अहमदपूरचे आमदार आणि अजित पवार गटाचे मंत्री असलेले बाबासाहेब पाटील यांच्यासह त्यांच्या नातेवाईकावर गंभीर आरोप झाले आहेत. एका शिक्षकाच्या मुलीनं व्हिडिओ बनवून हे आरोप केले आहेत. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे भाचे जावई अशोक जाधव यांच्यामुळे एका शिक्षकाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येत आहे.

आरोपांनुसार, लातूरच्या चाकूर येथील शिक्षक रमाकांत तांदळे यांच्या नावाने अशोक जाधव यांनी कर्ज घेतले होते. लगेच परतफेड करण्याचे आश्वासन देऊन हे कर्ज घेण्यात आले होते, परंतु पाच वर्षे होऊनही ते फेडले नाही. यामुळे तांदळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. याबद्दल मंत्री बाबासाहेब पाटील आणि पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही उपयोग झाला नाही, असे शिक्षकाच्या मुलीने म्हटले आहे. पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेवर रोहित पवार यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, योग्य कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात बाबासाहेब पाटील, अशोक जाधव आणि तत्कालीन मुख्याध्यापक खान सय्यद यांना जबाबदार धरले आहे.

Published on: Oct 27, 2025 11:33 AM