Baramati : अजितदादाच चेअरमन… माळेगाव कारखाना अजित पवारांच्या ताब्यात, किती उमेदवारांनी मारली बाजी?
Malegaon Sugar Factory Election 2025 बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान २२ जून रोजी झालं असून बळीराजा पॅनल, सहकार बचाव पॅनल आणि निळकंठेश्वर पॅनल यांच्यात तगडी लढत झाल्याचे पाहायला मिळाले.
माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने बाजी मारलेली आहे. 21 पैकी 12 उमेदवार जिंकून अजित दादांनी बाजी मारली. तर शरद पवार गटाच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे. या निकालानंतर माळेगाव कारखाना अजित पवार यांच्या ताब्यात आलाय. कारखाना निवडणुकीत अजित पवार स्वतः निवडून आले आहेत. 101 पैकी 91 मतं घेऊन अजित दादांचा दणदणीत विजय झाला आहे. अजित पवार यांच्या नीळकंठेश्वर पॅनेलचे 21 पैकी 12 उमेदवार विजयी झाले. तर सहकार पॅनेलच्या रंजन तावरे यांचा 362 मतांनी दारूण पराभव झाला. नीळकंठेश्वर पॅनेलचे सात उमेदवार अजूनही आघाडीवर आहेत. विरोधी सहकार पॅनेलचे फक्त दोनच उमेदवार आघाडीवर आहेत. तर सहकार पॅनेलचे चंद्रराव तावरे हे मात्र आघाडीवर आहेत.
Published on: Jun 25, 2025 07:19 PM
