Ajit Pawar : मी कामाचा माणूस पण शरद पवारांच्या कामाला तोड नाही… दादांकडून तोंडभरून कौतुक
अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या कामाचे कौतुक केले आहे, त्यांच्या कामाला तोड नसल्याचे म्हटले. स्वतःला कामाचा माणूस संबोधत, त्यांनी बारामतीचे नेतृत्व करताना शरद पवारांशी आपली तुलना होणार याची जाणीव १९९१ पासूनच असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच शरद पवारांच्या कामाचे कौतुक केले आहे. “शरद पवार यांच्या कामाला तोड नाही,” असे विधान त्यांनी केले. अजित पवारांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेत्याप्रती आदर व्यक्त केला. यावेळी बोलताना अजित पवारांनी स्वतःच्या कार्यशैलीवरही प्रकाश टाकला. “मी कामाचा माणूस हे छातीठोकपणे मी सांगतो,” असे ते म्हणाले. आपल्याला लोकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे नमूद करत, “मी तुमचं प्रतिनिधित्व करायचं बंद करेल, त्यावेळेस तुम्हाला आठवेल, दादा पाहिजे होता,” असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. “मी ज्यावेळेस १९९१ ला आमदार झालो, तेव्हाच माझ्या मनात होतं की, पवार साहेबांच्या नंतर तू बारामतीचं नेतृत्व करतोस, तेव्हा लोक पावलोपावली तुझी आणि साहेबांची तुलना करणार,” असे त्यांनी सांगितले. शरद पवारांच्या कामाची पद्धत अद्वितीय असून त्याला कुणीही तोड देऊ शकत नाही, यावर त्यांनी भर दिला.
