Ajit Pawar : काय वॉच ठेवायठचा तो ठेवा… निधीवाटपाच्या ‘त्या’ आरोपांवर दादा थेटच बोलले; नेमकं काय म्हणाले?
आज मंत्रालयात शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत जे आपल्या हक्काचं आहे, ते आपल्याला मिळालंच पाहिजे, अशी भूमिका घेत शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना अजित पवार यांच्या अर्थखात्यावर नजर ठेवण्याचं सांगितल्याचं बोललं जातंय.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील मंत्र्यांनी निधीवाटपावरून शिंदे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्ती केली. या नाराजी नंतर एकनाथ शिंदेंनी देखील अजित पवार यांच्या खात्यावर वॉच ठेवा असं आपल्या मंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. निधी वाटपावरूनच अजित पवार एकनाथ शिंदेंच्या भेटीला त्यांच्या दालनात गेले. या आधी शिंदेंच्या मंत्र्यांनी शिंदेंकडे निधी वाटपावरून दादांची तक्रार केली होती. तक्रारीनंतर शिंदेनी मंत्र्यांना दादांच्या निधीवर वॉच ठेवा असं सांगितल्याची माहिती आहे. तर अजित पवार यांच्या खात्यामध्ये 14-14 हजार कोटींच्या दोन निधींवर शिंदेनी लक्ष ठेवण्यास सांगितलं असल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात अजित पवार यांनाच माध्यम प्रतिनिधींनी सवाल केला असता अजित पवार स्पष्टच म्हणाले, काय वॉच ठेवायचा तो ठेवा… अर्थ खात्यावर वॉच ठेवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे.
