मतांसाठी निधी अन् कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी…अजितदादा सापडले वादात

| Updated on: Apr 18, 2024 | 11:22 AM

मतांसाठी निधी, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदीच्या वक्तव्यावरून विरोधक अजित पवारांवर आक्रमक झालेत. मुलींच्या जन्मदरावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण काय बोलतोय. याचा विचार राहिला नाही. मुलींचा घटता जन्मदर पाहून द्रौपदीचा विचार....

बारामतीच्या प्रचारासाठी अजित पवार इंदापुरात होते. मात्र आपल्या वक्तव्याने अजित पवारांनी वाद ओढावून घेतला आहे. मतांसाठी निधी, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदीच्या वक्तव्यावरून विरोधक अजित पवारांवर आक्रमक झालेत. मुलींच्या जन्मदरावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण काय बोलतोय. याचा विचार राहिला नाही. मुलींचा घटता जन्मदर पाहून द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय? असं वाटायचं..असं अजित पवार म्हणाले. इंदापुरात सभेत बोलत असताना अजित पवार म्हणाले, आम्ही मधल्या काळात बघितलं, मुला-मुलींच्या जन्मदरात काही जिल्ह्यांमध्ये एवढी तफावत बघायला मिळाली की, 1000 मुले जन्माला आले की त्यावेळेस 800 ते 850 मुली जन्माला येत होत्या. पण हा दर 790 पर्यंत गेला. मी म्हटलं, पुढे तर अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? असा प्रसंग त्यावेळेस येईल… याच वक्तव्यावर विरोधकांनी चांगलंच तोंडसूख घेतलंय.

Published on: Apr 18, 2024 11:22 AM