Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी परंपरा पाळली, पहिल्या राखीचा मान बहीण पंकजा मुंडेंनाच, म्हणाले…
पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. या वर्षीचा रक्षाबंधनाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला, ज्यामध्ये राजकीय मतभेद विसरून या दोन्ही भावंडांनी एकत्र येऊन हे पवित्र बंधन साजरे केले.
अनेक वर्षांपासून या दोन भावंडांमध्ये राजकीय मतभेद दिसून आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांच्या नात्यातील कटुता कमी झाली. या घटनेनंतर, त्यांनी एकत्रितपणे रक्षाबंधन साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यामुळे त्यांच्या नात्यातील गोडवा पुन्हा एकदा दिसून आला. पंकजा मुंडे यांनी रामटेकवर रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला. यावेळी, धनंजय मुंडे यांना राखी बांधण्याची परंपरा कायम ठेवली. या प्रसंगी धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत, सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात. एक वेगळा अदभूत आनंद मिळाला असे म्हणतांना मुंडे साहेबांना हा बंगला सोडावा लागला होता आणि पंकजा मुंडे या आता रामटेकवर आहेत आणि त्यासाठी मी येथे आलोय. अनेक वर्षांपासून मी रक्षाबंधन करतो ही परंपरा कायम आहे. रामटेक च्या आठवणींना उजाळा मिळाला आम्ही त्याबद्दल बोललो असेही त्यांनी म्हटले.
