Jayant Patil Supporters Protest : गोप्याला चप्पलेनं हाणणार… पडळकरांविरोधात घोषणाबाजी; जयंत पाटील समर्थक आक्रमक, महिलांचा मोठा सहभाग

Jayant Patil Supporters Protest : गोप्याला चप्पलेनं हाणणार… पडळकरांविरोधात घोषणाबाजी; जयंत पाटील समर्थक आक्रमक, महिलांचा मोठा सहभाग

| Updated on: Sep 20, 2025 | 3:35 PM

जयंत पाटील समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांच्या विधानाविरुद्ध वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर येथे आक्रमक आंदोलन केले. महिला आंदोलकांचा मोठा सहभाग होता. रस्ता रोको आणि टायर जाळण्यासारख्या कृती करण्यात आल्या. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

ईश्वरपूर येथे जयंत पाटील समर्थकांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानाविरुद्ध आक्रमक आंदोलन केले. काल जत आणि ईश्वरपूर येथे झालेल्या निदर्शनानंतर आजही रस्ते रोखण्यात आले आणि टायर जाळण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आंदोलक सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले, तरीही आंदोलकांनी पडळकर यांनी जयंत पाटील यांची माफी मागावी अशी मागणी केली. आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरुद्ध निषेध नोंदवत असे आंदोलन सांगली जिल्ह्यासह राज्यभरात सुरू असल्याचे पाहायला मिळतंय.

Published on: Sep 20, 2025 03:35 PM