Supriya Sule | ईडी सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू – tv9

| Updated on: Jan 04, 2023 | 8:32 PM

ईडी सरकारने मीडियाशी बोलण्याऐवजी आंदोलनकर्त्यांशी बोलायला हवं. एखाद्या दिवशी प्रसिद्धी मिळाली नाही तर काय बिघडतं का? असा सवाल ही त्यांनी केला.

Follow us on

पुणे : राज्यात असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज, उर्फी जावेद आणि इतर वादांवर आज राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या. तसेच यावेळी त्यांनी भापज-शिंदे सरकारवर सडकून टीका देखिल केली. आपल्या संविधानात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तो अधिकार असल्यानं त्यात गैर काय? असा सवाल भाजपवाल्यांना केला आहे.

त्याचबरोबर सुळे यांनी महागाई, नोकरी आणि वीजेवरही भाष्य केलं. तर ईडी सरकारने मीडियाशी बोलण्याऐवजी आंदोलनकर्त्यांशी बोलायला हवं. एखाद्या दिवशी प्रसिद्धी मिळाली नाही तर काय बिघडतं का? असा सवाल ही त्यांनी केला.

तर मुख्य मागणीला बगल द्यायचं. हेच तर सध्या सुरु आहे. असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला. तसेच हे सरकार सुडाचे राजकारण करत असल्याची टीका देखिल सुळे यांनी केली आहे.