“राज्यपालांना महाराष्ट्रातील महापुरूष मान्य नाहीत का?”, धनंजय मुंडेंचा परखड सवाल

“राज्यपालांना महाराष्ट्रातील महापुरूष मान्य नाहीत का?”, धनंजय मुंडेंचा परखड सवाल

| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 4:59 PM

महाराष्ट्राच्या राज्यपालांना आपले महापुरुष नकोयत. अर्थसंकल्पातलं अभिभाषण नकोय आणि राष्ट्रगीतही नकोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी आज टीव्ही 9 शी बोलताना केली. महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरु झालंय. मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला […]

महाराष्ट्राच्या राज्यपालांना आपले महापुरुष नकोयत. अर्थसंकल्पातलं अभिभाषण नकोय आणि राष्ट्रगीतही नकोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी आज टीव्ही 9 शी बोलताना केली. महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरु झालंय. मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राज्यपालांचा धिक्कार असो, अशा घोषणा महाविकास आघाडी सरकारतर्फे देण्यात आल्या.

Published on: Mar 03, 2022 04:56 PM