NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत कोर्टात काय झाला युक्तिवाद? पुढील सुनावणी कधी?
राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. शरद पवारांच्या वकिलांनी युक्तिवादासाठी दोन तास मागितले. न्यायालयाने सुरुवातीला कोणत्या प्रकरणावर युक्तिवाद करणार, असे विचारले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता होणार आहे, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला झाली आहे. या प्रकरणाच्या युक्तिवादासाठी शरद पवार यांच्या वकिलांकडून, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी दोन तास लागतील असे सांगण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सुरुवातीला कोणत्या प्रकरणावर युक्तिवाद करणार आहात, अशी विचारणा केली. या प्रकरणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने आता पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेवर आता 21 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील पक्षाच्या नियंत्रणाशी संबंधित या महत्त्वपूर्ण प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
Published on: Nov 12, 2025 04:27 PM
