Eknath Khadse : माझा एकुलता एक मुलगा गेला, गिरीश महाजनला मुलगा नाही त्यामुळे… एवढीच हिंमत असेल तर… संतापलेल्या खडसेंचं चॅलेंज काय?
प्रफुल लोढांवर आताच कसे गुन्हे दाखल व्हायला लागले? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी आक्षेपार्ह काही बोललोच नाही, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
‘एकुलता एक मुलगा माझा गेला त्याचं दुखः माझ्या मनातून गेलं नाही. महाजनला मुलगा नाही त्यामुळे त्याला मुलाचं दुखः कळू शकणार नाही. गिरीश महाजनांमध्ये हिंमत असेल ताकद असेल तर या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करावी’, अशी मागणी खडसेंनी केली आहे. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रफुल लोढा प्रकरणावरुन चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसेंच्या मुलाचे हत्याप्रकरण चर्चेत आणल्याने खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे समोर आले पाहिजे असे म्हणत खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला, असे प्रफुल लोढाने सांगितल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला होता. दरम्यान, महाजनांच्या या दाव्यावर खडसेंनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
