मुश्रीफ यांचा आज उच्च न्यायालयात फैसला? त्या आधी का घेतली अजित पवारांची भेट

| Updated on: Apr 27, 2023 | 12:31 PM

यादरम्यान सुनावणीच्या आधी त्यांनी विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटी मागचे नेमकं कारण कळू शकलेलं नाही.

Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे सुरू झालेला ईडीची पीडा काही थांबलेली नाही. त्यांना आता उच्च न्यायालयाचे फेरे मारावे लागत आहेत. मुश्रीफ यांना ईडी प्रकरणात अटकेपासून दिलेलं संरक्षण 27 एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात आले होते. त्यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांनी आता दिलासा मिळतो का? की त्यांना धक्का लागतो हे पहावं लागणार आहे. यादरम्यान सुनावणीच्या आधी त्यांनी विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटी मागचे नेमकं कारण कळू शकलेलं नाही. मात्र त्यांच्या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधान आलं आहे. या भेटीचे संबंध अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाशी लावले जात आहेत. याच्याआधी ईडी प्रकरणात 13 एप्रिल सुनावणी झाली होती. त्यावेळी मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली होती.