Jitendra Awhad : बेशरम खूप वाईट… मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण

Jitendra Awhad : बेशरम खूप वाईट… मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण

| Updated on: Jul 18, 2025 | 2:58 PM

जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या देण्यात आल्या. रोहित पवारांचा पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर हा आरोप करण्यात आला आहे. यावर काय म्हणाल्या आव्हाडांच्या पत्नी?

गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला गलिच्छ शिवीगाळ केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आई-बहिणीवरून पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्वीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. ‘नताशाला ट्विटरवर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आला. आपण कोणत्या लोकप्रतिनिधींना निवडून देतोय. ही नेत्याची संस्कृती?’, असा सवाल उपस्थित करत ऋता आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. ऋता आव्हाड पुढे असंही म्हणाल्या, विधीमंडळात झालेला राडा ज्यांनी घडवून आणला, त्या सर्वांना गृहखात्याने पकडून आणल्यास त्यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरात लिहिले जाईल, असं म्हणत त्यांनी खोचक भाष्यही केले.

Published on: Jul 18, 2025 02:58 PM