आम्हाला न्याय द्या, माजी गृह मंत्र्याची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

| Updated on: Jan 09, 2023 | 11:51 AM

यावेळी देशमुखांनी यांनी, काटोल व नरखेड तालुक्यातील जनतेला त्यांच्या न्याय हक्कासाठी नागपूर येथे न्यायालयीन कामासाठी फेऱ्या माराव्या लागतात. हे वेळ खाऊ आहेच त्याचबरोबर गरिब जनतेला न परवडणारे देखिल

Follow us on

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री अनिल देशमुख जामीनावर बाहेर आहेत. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी आपल्या मतदार संघावर लक्ष्य घालण्यास सुरूवात केली आहे. गेले कित्येक दिवस ते आत असल्याने मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागले नव्हते. यानंतर त्यांनी आता याकडे लक्ष देण्यास सुरू वात केली आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांनी मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं असून, मतदारसंघातील मागणीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. तसेच हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती केली आहे.

यावेळी देशमुखांनी यांनी, काटोल व नरखेड तालुक्यातील जनतेला त्यांच्या न्याय हक्कासाठी नागपूर येथे न्यायालयीन कामासाठी फेऱ्या माराव्या लागतात. हे वेळ खाऊ आहेच त्याचबरोबर गरिब जनतेला न परवडणारे देखिल. त्यामुळे यामुळे काटोल येथेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची मागणी केली आहे. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने तत्वत: मंजुरीही दिली आहे.

आता ही प्रस्ताव राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी असून त्याला लवकर मान्यता देण्यासह आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.