मुंबई-गोवा महामार्ग तातडीने दुरुस्त करा, सुनील तटकरेंनी घेतली नितीन गडकरींची भेट

मुंबई-गोवा महामार्ग तातडीने दुरुस्त करा, सुनील तटकरेंनी घेतली नितीन गडकरींची भेट

| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 6:50 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. सुनील तटकरे यांनी नितीन गडकरींकडे जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि पूर स्थितीमुळे नुकसान झालेल्या महामार्गांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी सुनील तटकरे यांनी केलीय.  गणेशोत्सव काळात मुंबईतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणातील गावी जात असतात. त्यामुळे सुनील तटकरे यांनी ही मागणी केलीय.