NCP Reunion Speculation : काका-पुतण्यानंतर ‘पॉवर’फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? दिल्लीतील डिनर पार्टीनं राज्यात खळबळ

| Updated on: Dec 12, 2025 | 10:39 AM

दिल्लीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजनात अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि गौतम अदानी उपस्थित होते. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजनाला अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. या डिनर पार्टीत उद्योगपती गौतम अदानी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी हजेरी लावली. या स्नेहभोजनादरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यात २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गौतम अदानी यांच्या उपस्थितीमुळे राजकीय मध्यस्थीच्या शक्यतांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत शरद पवारांच्या गटाकडून स्पष्ट नकार दिला जात नसून, अनेक आमदारांची भावना दोन्ही गट एकत्र यावेत अशी असल्याचे समोर आले आहे.

Published on: Dec 12, 2025 10:39 AM