शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, कारण काय? काय झाला संवाद? राजकीय वर्तुळात चर्चा
यवत येथील हिंसाचारामागे आक्षेपार्ह व्हाट्सअॅप पोस्ट हे कारण असल्याचे समोर आले आहे. या पोस्टमुळे दोन गटांमध्ये संघर्ष झाला, ज्यात दुकान आणि बेकरी जाळण्यात आल्या. पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या हिंसाचारामुळे व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना मोठे नुकसान झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. या बातमीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मात्र पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये झालेल्या दोन गटातील तणावाच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. इतकंच नाहीतर या घटनेचे समाजात तीव्र पडसाद उमटू नये आणि समाजिक सलोखा कायम रहावा याकरता शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि या विषयावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून त्यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती मिळतेय. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या फोनवरील संवादात त्यांनी प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचेही सांगितले.
Published on: Aug 02, 2025 03:03 PM
