Rohit Pawar Video : ‘ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी…’, सरकारच्या धोरणावरून रोहित पावारांचा हल्लाबोल

Rohit Pawar Video : ‘ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी…’, सरकारच्या धोरणावरून रोहित पावारांचा हल्लाबोल

| Updated on: Mar 06, 2025 | 5:07 PM

'ज्याला गुजराती जमते त्यालाच नोकरी हे सरकारचं धोरण आहे का?', असा थेट सवाल आमदार रोहित पवार यांनी केलाय. विधानभवन परिसरात बोलत असताना मराठी भाषेच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी सरकारलाच सवाल केले

‘ज्याला गुजराती जमते त्यालाच नोकरी हे सरकारचं धोरण आहे का?’, असा थेट सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. विधानभवन परिसरात बोलत असताना मराठी भाषेच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी सरकारलाच धारेवर धरलंय. दरम्यान, यासंदर्भात रोहित पवारांनी एक ट्वीट देखील केल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला विरोध करून इतर भाषेचा आग्रह धरणे म्हणजे खाल्ल्या मिठाला न जागण्याचा प्रकार असल्याचे म्हणत रोहित पवार मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. रोहित पवार यांनी एक ट्वीट करून त्यात असे म्हटले की, भाजप नेत्यांकडून वारंवार मराठीची गळचेपी होत असताना आता भैया जोशींचे गुजराती प्रेम ओसंडून वाहिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. इतकंच नाही तर खुद्द महाराष्ट्र शासनच गुजराती भाषेत एखाद्या कार्यक्रमाची जाहिरात करत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका काय? सरकार मराठी भाषेबाबत उदासीन आहे, हेच सिद्ध होत आहे, असं म्हणत रोहित पवारांनी हल्लाबोल केलाय.

Published on: Mar 06, 2025 05:07 PM