पवार कुटुंबियांवर बोलल्याशिवाय बातम्या होत नाहीत, सुप्रिया सुळे यांचा पडळकर यांना टोला
आमच्या घरावर बोलल्याशिवाय बातमी होत नाही. आमच्यावर बोलून कुणाची प्रसिध्दी होत असेल तर होऊ द्या, सुप्रिया सुळेंचा टोला
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे पुत्र राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार शंभुराज देसाई यांच्या भेटीसाठी गेले होते, त्यामुळे ते राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या घराबाबत बोलल्याशिवाय कोणती बातमी होत नाही. त्यामुळे पवार कुटुंबियांबद्दल बोलले जाते. त्यामुळे आमच्या बद्दल जे कोणी बोलत असतील तर ते नक्कीच ऐकून घेऊ, एवढे तर आम्ही दिलदार आहोत, आमच्यावर बोलून कुणाची प्रसिध्दी होत असेल तर होऊ द्या, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी गोपीचंद पडळकर यांना खोचक टोलाही लगावला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. अतिथी देवो भवचे संस्कार आमच्यावर झाल्याने जे कोणी बारामतीमध्ये येईल त्यांचे स्वागतच केले जाईल, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
