राज्यात महिला अत्याचाराच्या 4 घटनांमधील आरोपींना अटक, निलम गोऱ्हे यांची माहिती

राज्यात महिला अत्याचाराच्या 4 घटनांमधील आरोपींना अटक, निलम गोऱ्हे यांची माहिती

| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 1:01 PM

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात महिला अत्याचाराच्या चारही घटन घटल्याने विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी माहिती घेतली. रत्नागिरी च्या घटनेत भरोसा सेल द्वारे काम केले आहे. महिला दक्षता समितीद्वारे अशा घटना घडू नये म्हणून काम करता येईल का याबाबत काम करु असं निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात महिला अत्याचाराच्या चारही घटन घटल्याने विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी माहिती घेतली. रत्नागिरी च्या घटनेत भरोसा सेल द्वारे काम केले आहे. महिला दक्षता समितीद्वारे अशा घटना घडू नये म्हणून काम करता येईल का याबाबत काम करु असं निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.4 ही घटनांत आरोपींना अटक झालीय, अशा घटना घडू नये म्हणून मोहीम हाती घेण्यासाठी गृहमंत्र्यांशी बोलणे झाले आहे, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. पुणे, पिंपरी आणि रत्नागिरीच्या घटनेवर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे शहर पोलिसांना आणि रत्नागिरीच्या एसपीशी बोलणं झालंय.
औरंगाबादच्या घटनेबद्दल अंबादास दानवे यांच्याशी बोलणं झालं आहे. या चारही घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे, मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चा केलीय, असंही त्या म्हणाल्या.