Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून मोठी माहिती समोर

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून मोठी माहिती समोर

| Updated on: Apr 30, 2025 | 5:45 PM

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात फारूख अहमदचा सहभाग असलयाची मोठी माहिती उघड झाली आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर फारुख अहमद याच्या नेटवर्कने पहलगाम हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. फारुख अहमद हा जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथील रहिवासी असून त्याचे घर नुकतेच भारतीय सुरक्षा दलाकडून जमीनदोस्त केल्याचे पाहायला मिळाले. एनआयएच्या सूत्रांकडून पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. फारूख अहमद हा लष्कर ए तैयबाचा टॉप कमांडर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून सध्या हाच फारूख अहमद पीओकेमध्ये लपून बसल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Apr 30, 2025 05:45 PM